पैठण, (प्रतिनिधी) संभाव्य नगरपरिषद निवडणूकीच्या संदर्भात शुक्रवारी पैठण येथे काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवाराची आढावा बैठक माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
याप्रसंगी मराठवाडा विभाग ओबीसी सेल अध्यक्ष कंचनकुमार चाटे, माजी तालुका अध्यक्ष दिलीप भोसले, माजी प.स. सभापती महंमद हनिफ, तालुका अध्यक्ष विनोद पा तांबे, शहर अध्यक्ष निमेश पटेल, शहर महिला अध्यक्ष सविता पवार, अनुसूचित विभाग शहर अध्यक्ष भीमराव नवगीरे, युवक शहर अध्यक्ष योगेश शिपणकर, माजी नगरसेवक तुकाराम लिंबोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी वाजत गाजत आपल्या समर्थकासह जाऊन पैठण करांचे लक्ष वेधले.
या वेळी ६४ उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. निमेश पटेल हेच शहराध्यक्ष :
आईन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील ' काही विघ्नसंतोषी लोकांनी पक्षात गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न करून काँग्रेस पक्षाच्या - शहराध्यक्षपदी हसनुद्दीन कट्ट्यारे यांच्या नावाची घोषणा केली होती. शुक्रवारी झालेल्या बैठकीत पक्षाचे प्रभारी भुसारी यांनी दूरध्वनीवरून जाहीर सभेत संगितले की, निमेश पटेल हेच काँग्रेस * पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली * नगरपरिषद निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले. - यावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी भाषणात सांगितले की, पैठण नगर परिषद जेंव्हा काँग्रेस 5 पक्षाच्या ताब्यात होती तेंव्हा कधीही बोगस कामे झाली नाही, की कधी कोणी भ्रष्टाचार केला नाही.
नगर परिषदेच्या इतिहासात कधीही इतकानिधी आला नाही. इतक्या प्रचंड प्रमाणात निधी येऊन ही शहराचा विकास झाला नाही. या आलेल्या निधीचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप त्यांनी केला.
तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून जातीयवादी पक्षाची सत्ता नगर परिषदेवर आहे, जे तुम्ही नगरसेवक निवडून दिले त्यांनी तुमची कामे न करता गुत्तेदारी केली, दोनशे कोटींचा निधी येऊनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर नाही, रस्ते नाही सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.
काँग्रेस सर्व जाती धर्माला न्याय देणारा असून विकासासाठी आपण काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना विजयी करावे सामाजिक जातीय वाद होऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडी व्हावी या करिता प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले. कंचनकुमार चाटे यांनी सांगितले की निमेश पटेल हेच शहर अध्यक्ष असून कोणीही कोणताही संभ्रम करून घेऊ नये असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक निमेश पटेल यांनी केले. यावेळी अध्यक्ष पदासाठी सुदैवी जोशी व कैसर जहाँ यांनी उमेदवारी मागितली. आढावा बैठकीस नंदकिशोर नजन, शेखर दाभाडे, गौतम बनकर, हमीद खान, सुदैवी जोशी, योगेश टेकाळे, महेश पवार, इकबाल शेख, तुळशीदास शिंदे, राजू गायकवाड, नितीन घटे, इम्रान पठाण, शिवाजी सदलासे, गब्बर तांबोळी, गौरव आठवले, अमित पठाण, सोमनाथ दारूनकर, चैतन्य बनकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हजारोच्या संख्येने इच्छुक उमेदवारांचे समर्थक उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. रमेश गव्हाणे यांनी केले तर आभार हमीद खान यांनी मानले.















